ऑनलाईन नोकरीच्या माध्यमातून फसवणूक

ऑनलाईन नोकरीच्या माध्यमातून फसवणूक

Published on

ठाणे, ता. ६ (वार्ताहर) : ऑनलाईन नोकरीच्या माध्यमातून अधिक नफा मिळून देण्याचे प्रलोभन दाखवून सात लाखांहून अधिकची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ३८ वर्षीय फिर्यादी यांच्या फोनवर एका व्यक्तीने ऑनलाईन पद्धतीने काम सुरू असल्याची माहिती दिली. यामध्ये ऑनलाईन कमिशन बेस्ड टास्कमध्ये अधिक नफा मिळण्याचे प्रलोभन दाखवले. त्यानंतर थोडेफार पैसे देत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. शिवाय ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगून सात लाख तीन हजार ७६२ रुपयांची फसवणूक केली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.