ऑनलाईनच्या माध्यमातून १० लाखांचा गंडा

ऑनलाईनच्या माध्यमातून १० लाखांचा गंडा

Published on

भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : पार्टटाईम नोकरीमधून नफ्याचे प्रलोभन दाखवून ऑनलाईन पद्धतीने तरुणाला १० लाखांचा गंडा घातल्याची घटना भिवंडीत उघडकीस आली आहे. धामणकर नाका परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महेवश सैयद याला १८ एप्रिल ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान एका व्हाट्सॲप धारकाने आणि टेलिग्रामधारकाने व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवून पार्टटाईम नोकरीचे प्रलोभन दाखवले. त्यामधून नफा मिळणार असल्याचे सांगून फिर्यादीला वारंवार भामट्यांनी त्यांच्या पंजाब नॅशनल व आयसीआयसीच्या बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार महवेशने आरोपींच्या बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने १० लाख ४५ हजार रुपयांचा भरणा केला; मात्र त्याला आजतागायत मूळ रकमेसह कोणत्याही प्रकारचे कमिशन मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने महवेश सय्यद याने नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.