मुंबई विद्यापीठाच्या बीएमएसचा निकाल जाहीर,

मुंबई विद्यापीठाच्या बीएमएसचा निकाल जाहीर,

Published on

मुंबई विद्यापीठाच्या
बीएमएसचा ७१ टक्के निकाल
मुंबई, ता. ६ : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या अंतिम वर्षाच्या एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या उन्हाळी सत्राच्या वाणिज्य विद्या शाखेच्या तृतीय वर्ष बीएमएस सत्र सहा परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सत्र सहाचा निकाल ७१.७१ टक्के लागला आहे.
बीएमएस सत्र सहाच्या परीक्षेमध्ये एकूण आठ हजार ११० विद्यार्थी यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेला १५ हजार ५१६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १७० विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. परीक्षेत ३ हजार २०० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यापीठाने आजपर्यंत २०२३ च्या उन्हाळी सत्राचे ८६ निकाल जाहीर केले आहेत. परीक्षेचे निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ वर प्रसिद्ध करण्यात आले असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.