पश्चिम उपनगरांतील १५० पूल होणार मजबूत

पश्चिम उपनगरांतील १५० पूल होणार मजबूत

Published on

मुंबई, ता. ६ ः पालिकेच्या पूल विभागाने मुंबईतील जीर्ण झालेल्या पुलांच्या मजबुतीकरणाचे काम हाती घेतले आहे. पश्चिम उपनगरांतील सुमारे १५० हून अधिक पुलांचा पाया मजबूत करणे, पृष्ठीकरण, बेअरिंग बदलणे आदी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. एकूणच पश्चिम उपनगरातील पुलांचे मजबुतीकरण करण्यात येणार असून त्यासाठी मुंबई महापालिका तब्बल ८७ कोटी २८ लाख ७ हजार १७४ रुपये खर्च करणार आहे.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरांत एकूण ४४९ पूल आहेत. हिमालय पूल दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांचे आयआयटीच्या माध्यमातून ऑडिट करण्यात आले आहे. ऑडिट अहवालात अनेक पुलांची दुरुस्ती व डागडुजी करणे अशा काही सूचना करण्यात आल्या आहेत. आयआयटीच्या सूचनेनुसार शहरातील १५ पुलांची दुरुस्ती करण्यात आल्यानंतर पूर्व उपनगरातील कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप आणि मुलुंडमधील पुलांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका ४२ कोटी रुपये खर्च करणार आहे. आता पश्चिम उपनगरातील १५० हून अधिक पुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. ६) निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदारास वर्कऑर्डर देण्यात येईल. पुलांची दुरुस्ती पावसाळ्यासह १५, १८ आणि २४ महिन्यांत पूर्ण करणे कंत्राटदाराला बंधनकारक असेल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.


- सांताक्रूझ पूर्व, वांद्रे पश्चिम आणि अंधेरी पश्चिम
खर्च ः २४,६७,३७,५०४ रुपये
कालावधी ः पावसाळ्यासह १८ महिने
--

- बोरिवली, दहिसर आणि अंधेरी पश्चिम
खर्च ः ३५,७९,०२,८५० रुपये
कालावधी ः पावसाळ्यासह १८ महिने
--
- कांदिवली
खर्च ः ७,१९,९३,५५ रुपये
कालावधी ः पावसाळ्यासह १५ महिने
--
आर मध्य बोरिवली
खर्च ः १२,२७,२२,५६० रुपये
कालावधी ः पावसाळ्यासह २४ महिने
--
दहिसर
खर्च ः ६,६३,५१,२०५
कालावधी ः पावसाळ्यासह १५ महिने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.