वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थिनींची फी माफ

वडिलांचे छत्र हरवलेल्या विद्यार्थिनींची फी माफ

Published on

नालासोपारा, ता. १० (बातमीदार) : वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन सख्ख्या बहिणींचे शालेय शैक्षणिक शुल्क माफ करून नालासोपाऱ्यातील कपोल शाळेने त्यांना पुढील शिक्षणासाठी बळ दिले आहे. या शाळेने घालून दिलेल्या आदर्श वस्तुपाठाचे कौतुक होत आहे.

वसईत राहणाऱ्या दीपक भंडारी यांचे २० नोव्हेंबर २०२२ रोजी आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नी दीपा यांच्यावरच कुटुंबाची जबाबदारी आली. त्यांच्या मुली काव्यांजली ही दहावीत, तर सुहानी सहावीत शिक्षण घेत आहे. पतीच्या निधनाने मुलींचे शालेय शुल्क भरणे आर्थिक कोंडमाऱ्यामुळे दीपा भंडारी यांना शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कपोल शाळा व्यवस्थापनाकडे निवेदनातून शालेय शुल्क माफ करण्याची विनंती केली. शाळा व्यवस्थापनानेदेखील सहानुभूतीने विचार करून दोन्ही मुलींचे शैक्षणिक शुल्क माफ केले. वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन मुलींचे शिक्षण शुल्क न भरल्यामुळे न थांबवता त्यांना प्रोत्साहित करत त्यांना शाळेत सामावून घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.