उपनगरी रेल्वे समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांची भेट

उपनगरी रेल्वे समस्यांबाबत रेल्वेमंत्र्यांची भेट

Published on

बदलापूर, ता. ८ (बातमीदार) : कल्याण-कर्जत दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे समस्या, तसेच संपूर्ण उपनगरीय रेल्वे समस्यांसंदर्भात मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी नवी दिल्लीत नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रेल्वेमंत्र्यांशी उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी कथोरे यांनी रेल्वेमंत्र्यांना ११ मागण्यांचे निवेदन दिले.
कल्याण-कर्जत, कल्याण-कसारादरम्यान, लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढवणे, बदलापूर आणि वांगणी रेल्वेस्थानकाचा जलद विकास करून प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच गुरवली या प्रस्तावित रेल्वेस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू करणे, मुरबाड रेल्वेसाठीची जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरळीत करणे, त्याचबरोबर कळवा, मुंब्रा स्थानकात गाड्यांना थांबा देणे, दिवा आणि पनवेल, रोहा भागात गाड्या वाढवणे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे या सगळ्या मागण्यांवर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच लवकरात लवकर या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी आमदार किसन कथोरे यांच्यासह, भाजप आयटी सेलचे प्रदेश समन्वयक डॉ. मिलिंद धारवाडकर, तसेच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजेश पाटील उपस्थित होते.
....
डॉ. कराड यांच्याशीही चर्चा
आमदार किसन कथोरे यांनी रेल्वेमंत्र्यांसह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन विविध विकास कामांबाबत चर्चा केली. यावेळी मुरबाड मतदारसंघात सुरू असलेल्या कामांबद्दल, तसेच ग्रामीण भागात सेंट्रल रिझर्व फंडातून विकास कामांना आर्थिक तरतूद करून देण्यासाठीची मागणी यावेळी करण्यात आली. यावर डॉ. भागवत कराड यांनी या मागणी संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरच याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.