भटक्या कुत्र्यांचा भेकरावर हल्ला

भटक्या कुत्र्यांचा भेकरावर हल्ला

Published on

उरण, ता. ८ ः तालुक्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. आवरे गावाजवळील जंगलात एका भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (ता. ६) घडली. या भेकरावर उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यातील अनेक गावांत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. भटकी कुत्री नागरिकांना चावा घेत आहेत. त्यामुळे गावागावांतील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या दहशतीत वावरताना दिसत आहेत. अशातच आवरे गावाजवळील जंगलात मुक्त संचार करणाऱ्या भेकरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे आश्रयासाठी हे भेकर आवरे गावातील एका रहिवाशांच्या घरात शिरले होते. या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्पमित्रांनी उरण येथील वन रक्षकाच्या मदतीने जखमी अवस्थेतील भेकराला उपचारासाठी पुणे येथे घेऊन गेले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.