बीकेसीतील एलबीएस मार्गावर नवीन पूल

बीकेसीतील एलबीएस मार्गावर नवीन पूल

Published on

मुंबई, ता. ८ ः वांद्रे संकुलातील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील पुलावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बीकेसीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून आता सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील एलबीएस मार्गावरील पुलाचे विस्तारीकरण केले जाणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी २९ कोटी ३८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

वांद्रे संकुलातील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवरील पूल एमएमआरएमार्फत बांधण्यात आला आहे; मात्र त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना बीकेसीतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्या पुलाचे विस्तारीकरण एलबीएस मार्गापर्यंत करून घाटकोपरला जाणाऱ्या मार्गास जोडण्याची मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात होती. सातत्याने केल्या जाणाऱ्या मागणीची दखल घेऊन आता नव्याने पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामामुळे बीकेसीमधून येणाऱ्या वाहनांना तीन सिग्नल टाळून एलबीएसमार्गे घाटकोपरला जाणे सोयीचे ठरणार आहे. पुलाच्या बांधकामामुळे इंधन आणि वेळेचीही बचत होणार असल्याचे सांगण्यात आले. मुंबई महापालिकेतर्फे पुलाच्या कामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून २९ कोटी ३८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कंत्राटदार कंपनीने २५ टक्के उणे दराने कंत्राट मिळवले आहे. सल्लागारासाठी ५४ लाख ८३ हजार कोटी रुपये मोजले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.