ढोल-ताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत

ढोल-ताशांच्या गजरात शरद पवार यांचे स्वागत

Published on

शहापूर, ता. ८ (बातमीदार) : ढोल-ताशांच्या गजरात आणि जोरदार घोषणांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे शनिवारी (ता. ८) शहापुरात स्वागत करण्यात आले. नाशिक दौऱ्यावर पक्ष बांधणीसाठी जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर येथे पार्थस्वार्थी पेट्रोल पंपाजवळ त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा यांनी मात्र या स्वागत सोहळ्यात दांडी मारल्याने येथे चर्चेचा विषय झाला होता. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष बांधणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथून त्यांनी नाशिक दौऱ्याला सुरुवात केली. भिवंडी, पडघा आणि शहापुरात त्यांचे स्वागत करण्यात आले. ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो’, ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.