पडघ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

पडघ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष

Published on

पडघा, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील पडघा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. नाशिक येथे दौऱ्यावर जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पडघ्याजवळील टोलनाका येथे आले असता भिंवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला कार्यकर्त्यांकडून त्यांचे औक्षण करून चाफ्याच्या फुलांचा हार घालून विठ्ठलाची मूर्ती भेट देण्यात आली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भिवंडी तालुका अध्यक्ष गणेश गुळवी, सुरेश पवार, जिल्हा चिटणीस योगेश जाधव, विभाग अध्यक्ष संतोष ठाणगे, पडघा शहर अध्यक्ष शिवा सुतार, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भोलेनाथ वाघेरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र पाटील, चंदू जाधव, सुनील पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.