मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहीम

मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधी मोहीम

Published on

अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या ३१८ जणांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरुद्ध ६ ते ७ जुलैदरम्यान विशेष मोहीम राबवून २४ तासांत सात गुन्हे नोंदवले आहेत. या कारवाईत आठ आरोपींना अटक केली आहे. या मोहिमेत ३१८ जणांवर कारवाई केली आहे. १,२२६ ग्रॅम गांजा आणि ६८ ग्रॅम मेफेड्रोनसह चरस, हेरॉईन असे ४२ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.
शहरातील सर्व पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, तसेच १४ परिमंडळीय पोलिस उपआयुक्त, २८ विभागीय सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व अधिकाऱ्यांनी एकत्रित कारवाई केली. अडीच महिन्यांत मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार ५०० गुन्हे दाखल करून ५६८ आरोपींना अटक केली आहे.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.