मेट्रो ४ च्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

मेट्रो ४ च्या कामासाठी वाहतुकीमध्ये बदल

ठाणे, ता. ८ (वार्ताहर) : ठाण्यातील घोडबंदर परिसरात मेट्रो-४ चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक ही संथगतीने सुरू ठेवण्यात आलेली आहे. ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानपाडा ते आनंदनगर दरम्यान सीपीसी, टी व आय गर्डर टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीच्या रस्त्यांमध्ये बदल करण्यात आलेली आहे. या वाहतूक मार्गातील बदलामुळे मात्र आता वाहनचालकांना आणि नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. ८ ते १८ जुलै या कालावधीत रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलीस शाखेचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे.


वाहतुकीत बदल
* मुंबई ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद
- पर्यायी मार्ग : कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेऊन खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूर फाटा मार्गे वाहने मार्गक्रमण करतील. कापूरबावडी जंक्शनला वळून कशेळी, अंजूर फाटामार्गे इच्छितस्थळी जातील..

* मुंब्रा-कळवामार्गे घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे प्रवेश बंद
- पर्यायी मार्ग : गॅमनमार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, माणकोली, अंजूर फाटामार्गे इच्छितस्थळी जातील.

* नाशिककडून घोडबंदरकडे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना माणकोली नाका येथे प्रवेश बंद
- पर्यायी मार्ग : वाहने मानकोली ब्रिजखालून उजवे वळण घेऊन अंजूर फाटा मार्गे जातील.

* मानपाडा येथे यू गर्डरचे काम करताना मानपाडा ब्रिजखालून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी वाहने मानपाडा ब्रिज ते येथून उजवे वळण घेऊन नीलकंठ ग्रीन सोसायटीमार्गे मुल्ला बाग येथून मुख्य रस्त्यास मिळून इच्छितस्थळी जातील.

* आनंद नगर येथे आय गर्डरचे काम करताना डी-मार्ट जवळून सेवा रस्त्याने पुढे आनंदनगर सिग्नलजवळ उजव्या बाजूस वळण घेऊन मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छितस्थळी जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com