शिवसेना शिंदे गटाचा मुस्लीम अल्पसंख्याक मेळावा

शिवसेना शिंदे गटाचा मुस्लीम अल्पसंख्याक मेळावा

महत्वाचा निरोप


शिवसेना शिंदे गटाचा मुस्लीम अल्पसंख्याक मेळावा
आधीची ही बातमी रद्द करून ही सुधारित बातमी लावावी
------
मुस्लिमांची व्होट बॅक तयार करण्याची शिंदे गटाचे प्रयत्न
शिवसेना शिंदे गटाचा मुस्लीम अल्पसंख्याक मेळावा

मुंबई, ता. ८ : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते सईद खान यांच्या नेतृत्वाखाली उद्या (ता. ९) मुस्लिम अल्पसंख्याक मेळावा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे यांनी आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिमांची ‘व्होट बॅंक’ बांधण्यास सुरुवात केल्याची चर्चा होऊ लागली आहे.

अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी हा मुस्लिम मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे शिंदे गटातर्फे सांगण्यात आले. गेल्या महिन्यापासून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू होती. राज्यभरातून मुस्लिम समाजातील विविध पक्षांचे सुमारे ३०० पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्यात नगराध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, व्यवसायिक यांचा समावेश आहे. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, खासदार श्रीकांत शिंदे, गजानन कीर्तिकर, माजी मंत्री रामदास कदम, माजी खासदार आनंदराव अडसूळ, खासदार भावना गवळी, राहुल शेवाळे, आमदार यामिनी जाधव, सदा सरवणकर, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खनिज कर्ममंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, आमदार भरत गोगावले, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, किरण पावसकर, दिलीप लांडे, शिवसेना सचिव संजय मोरे, संजय मासोलकर, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सईद खान यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीला सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करत आहेत. मुस्लिम समाजाला एकत्र करून त्यांना ताकत देण्याचे काम आम्ही करत आहोत.
- सईद खान, शिवसेना युवा नेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com