‘एक सही संतापाची’ उपक्रमाला तुर्भे रेल्वे स्थानकात उत्फुर्स प्रतिसाद

‘एक सही संतापाची’ उपक्रमाला तुर्भे रेल्वे स्थानकात उत्फुर्स प्रतिसाद

घणसोली, ता. १० (बातमीदार) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर एक सही संतापाची हा उपक्रम राबवला जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल आणि त्याप्रती सर्वसामान्य माणसाचा संताप व्यक्त करण्यासाठी नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर ही मोहीम राबवण्यात आली. या वेळी मनसे तुर्भे विभाग अध्यक्ष चंद्रकांत मंजुळकर यांच्या नेतृत्वात तुर्भे रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (ता. ९) सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत एक सही संतापाची ही मोहीम राबवण्यात आली. राजकीय परिस्थितीवर चिडलेल्या जनतेने या उपक्रमात उदंड प्रतिसाद दिला. यामध्ये नवी मुंबईतील अनेक स्थानकांतील प्रवाशांनी सही करून आपले मत नोंदवले; तर प्रवाशांनी मनसे कार्यकर्त्यांसमवेत सध्याच्या राजकीय घडामोडीवर आपले मतही व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com