शिवसेनेच्यावतीने आग्रोळी गावातील विकासकामांचे उदघाटन

शिवसेनेच्यावतीने आग्रोळी गावातील विकासकामांचे उदघाटन

Published on

जुईनगर, ता. १० (बातमीदार) : शिवसेनेच्या स्थानिक माजी नगरसेविका सरोज पाटील व उपजिल्हा प्रमुख रोहिदास पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शनिवारी (ता. ८) प्रभाग क्रमांक १०१ आग्रोळी गाव येथील विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये आग्रोळी गावातील उड्डाण पुलाखालील उद्यानात लहान मुलांना खेळण्यासाठीचे विविध साहित्य बसविण्यात आले. आग्रोळी स्मशानभूमीमध्ये नागरिकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था, पत्रा शेड व सुरक्षा रक्षक केबिन बसविण्याच्या कामाचा शुभारंभ स्थानिक ज्येष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आला. तसेच इन्कमटॅक्स कॉलनीमधील उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी गझेबो, नवीन संरक्षण भिंत व अंतर्गत सुशोभिकरनाच्या कामाचा शुभारंभ सांदीपानी को.ऑप.हौ.सोसायटीचे उपाध्यक्ष मनोहर इंगवले, सचिव प्रकाश पांचाळ, सुजाता म्हात्रे, गीतांजली सावंत, संगीता बोंबले, समाजसेवक अजय पासवान, नितीन पवार, रोहिदास राठोड यांच्या उपस्थित करण्यात आला. यावेळी पारसिक हिल येथील मुख्य चौकात हायमास्ट लावण्याच्या कामाचा शुंभारभ देखील करण्यात आला. या प्रसंगी पारसिक हिल ओनर ऑनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय ठाकुर, नारायण भार्गव, युवा शहर प्रमुख नयन पाटील, बेबिबाई पाटील, गीता पाटील, श्वेता पवार, दर्शनी जाधव, समाजसेवक नीलकंठ पाटील, सोमनाथ म्हात्रे, संदेश पाटील, दीपक पाटील, दिनेश माळी, नागेश चव्हाण यासह शिवसेना आजी-माजी पदाधिकारीसह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.