विकासाकासाठी स्थलांतरित केलेले बस थांबा पुन्हा जागेवर

विकासाकासाठी स्थलांतरित केलेले बस थांबा पुन्हा जागेवर

घणसोली, ता. १० (बातमीदार) : गेल्या १५ वर्षांपासून घणसोली सेक्टर-३ या ठिकाणी परिवहन विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या बस थांब्यांची जागा नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाने बांधकाम व्यावसायिकाच्या सोयीसाठी बदलल्याने नागरिकांमध्ये संताप पाहायला मिळाला, मात्र अगदी काही दिवसांतच या बस थांब्याची जागा पूर्ववत करण्यात आली आहे.

घणसोली सेक्टर-३ याठिकाणी (पाण्याची टाकी) असलेल्या बस थांबा मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सेक्टर-१ ते सेक्टर-४ मधील नागरिकांना सोयीस्कर पडणारा हा बस थांबा आहे, या बस स्थानकाच्या मागच्या बाजूस एक बांधकाम प्रकल्प तयार होत असल्याने या विकासकाने हा बस थांबा पुढे दारुच्या दुकानासमोर स्थलांतरित केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली होती, त्यामुळे नागरिकांना रोज या दारूच्या दुकानासमोरून प्रवास करावा लागत होता, या मागे प्रवाशांच्या सुरक्षेचे कारण सांगितले जात आहे, मात्र विकासकाच्या फायद्यासाठी परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला. दारूच्या दुकानासमोर बस थांबा असल्याने महिला लहान मुले यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. सोबतच रात्रीच्या वेळेस या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची देखील शक्यता होती, यासंदर्भात समाजसेवक कृष्ण पाटील यांनी परिवहन विभागाला यासंदर्भात तक्रार केल्यानंतर अखेर या बस स्थानकाची जागा पूर्ववत करण्यात आली आहे, मात्र परिवहन विभागाला प्रवाशांच्या सोयीपेक्षा विकासकाच्या अडचणी जास्त महत्वाच्या वाटू लागल्या का? असा प्रश्‍न स्थानिक विचारत आहेत. यापूर्वीही घणसोली विभागात बस थांबे हलविण्याचे प्रकार घडले आहेत, असे प्रकार परिवहन विभागाने थांबवावे अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

घणसोली सेक्टर-३ येथील बस थांब्याची सोयीचे असल्याने परिवहन विभागाने घेतलेला निर्णय चुकीचा होता रात्रीच्या वेळी दारू समोर असलेला बस थांबा महिला प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरू शकला असता.
- वर्षा निकम, प्रवासी

घणसोली सेक्टर-३ याठिकाणी असलेल्या बस थांब्याची जागा बदलण्यासाठी विकसकाने एका बोगस संस्थेलायाबद्दल पत्र द्यायला लावले होते, हे पत्र परिवहन विभागाला दिल्यांनतर त्यांनी बस थांब्यांची जागा बदली होती. मात्र नागरिकांना होणार त्रास लक्षात घेऊन बस थांब्याची जागा पूर्वरत करण्यात आली आहे.
- कृष्ण पाटील, समाजसेवक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com