चिरनेरचा अक्का देवी धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण

चिरनेरचा अक्का देवी धबधबा ठरतोय पर्यटकांसाठी आकर्षण

उरण,ता.१० (वार्ताहर) : पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना वर्षा सहलीची ओढ लागते. कुटुंब, मित्रमंडळीसह मौजमजा करण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले ही डोंगर, तलाव किंवा दरीतून वाहणाऱ्या धबधब्याकडे वळतात. त्यात इतिहास प्रसिद्ध चिरनेर गावातील अक्का देवी माकराणावरील धबधबा हा देखील पर्यटकांसाठी आकर्षक पर्यटनस्थळ ठरत आहे. रविवारी सुटीच्या दिवशी आक्कादेवी धरण पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळत होते.

निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या चिरनेर गावात श्री महागणपती जागृत देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच १९३० साली ब्रिटिश सरकार विरोधात जंगल सत्याग्रहात लढल्या गेलेल्या आणि हुतात्म्यांच्या बलिदानानी पावन झालेली भूमी म्हणून चिरनेर गाव इतिहास प्रसिद्ध आहे, अशा ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावात फेसाळणारा अक्का देवी धबधबा हा डोंगर कुशीत वाहत आहे. धबधब्याचे तुषार अंगावर झेलण्यासाठी अनेक पर्यटक, तरुणवर्ग, काहीजण सहकुटुंब वर्षा सहलीसाठी येथे येत असतात. चिरनेर गावातील श्री महागणपती देवस्थानचे दर्शन तसेच हुतात्मा स्मारकांना अभिवादन केल्यावर साधारण दिड किलो मिटर अंतरावर नागमोडीच्या वळण रस्त्यावरुन डोंगर परिसरात, निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आणि फेसाळणारा अक्का देवी धबधबा पर्यटकांच्या दृष्टीत पडतो. या धबधब्यावर वर्षातून एकदा तरी आनंद घेण्याची मजा काही वेगळीच असते, असे इथे येणारे पर्यटक सांगत असतात. गत रविवारी उरण, नवीमुंबई, पनवेल, ठाणे परिसरातील अनेक पर्यटकांनी अक्का देवी धबधब्यावर गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.


--
चिरनेर गावातील अक्का देवी धबधबा हा निश्चितच प्रेरणादायी, पर्यटकांना आकर्षित करणारा धबधबा आहे. मात्र चिरनेर ग्रामपंचायतीने या परिसराच्या विकासासाठी तसेच रहदारीच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी, पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उभी करण्यासाठी पुढाकार घेतला तर निश्चितच मुंबई, नवीमुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असणारा चिरनेर गाव एक पर्यटक क्षेत्र म्हणून उदयास येईल.
- अनंत नारंगीकर, स्थानिक सामाजिक कार्यकर्ते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com