शाहू उद्यानातील वाचनालयात बदल

शाहू उद्यानातील वाचनालयात बदल

शाहू उद्यानातील वाचनालयात बदल
नागरिक नाराज; पूर्ववत सुरू करण्याची रहिवाशांची मागणी

जीवन तांबे ः सकाळ वृत्तसेवा
चेंबूर, ता. १० ः गोवंडीतील छत्रपती शाहूजी महाराज उद्यानात बांधण्यात आलेले वाचनालय पूर्ववत करावे, तसेच टर्फ काढून टाकावे, अशी मागणी गोवंडीतील नागरिकांनी केली आहे. यासाठी स्थानिकांनी पालिकेच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गोवंडी येथील शिवाजी नगर परिसरातील पालिका शाळेच्या मागे शाहूजी महाराज उद्यान आहे. या उद्यानात एकूण सहा हजार स्वेअर फूटपेक्षा अधिक जागा आहे. यामध्ये फक्त वाचनालय केवळ तीन हजार स्वेअर फूट जागेत बांधण्यात आले आहे. गोवंडी परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्या आहे. या झोपडपट्टीमध्ये बहुतांश घरे ही दहा बाय दहाची आहेत. अल्प जागेमुळे विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करणे शक्य होत नाही. या विद्यार्थ्यांचा विचार करून पालिकेने छत्रपती शाहू महाराज उद्यानात वाचनालय बांधले आहे.

रचनेत बदल
सध्या हे वाचनालय नियाज अहमद मायनॉरिटी एज्युकेशन अँड वेल्फेअर लायब्ररी स्टडी सेंटर या संस्थेला चालविण्याकरिता देण्यात आले आहे. मात्र या संस्थेने परस्पर वाचनालयाच्या मूळ रचनेत बदल करत त्याचे दोन दोन भाग केले आहेत. एका भागात वाचनालय, तर दुसऱ्या भागात कौशल्ये केंद्र बनविले आहे. त्यामुळे वाचनालयात अभ्यास करण्यासाठीची जागा कमी झाली आहे.

मुलांचे नुकसान
कौशल्य केंद्रासाठी वाचनालयाच्या समोरच्या मोकळ्या जागेवर सिमेंटचे क्रिकेट टर्फ बनविले आहे. या टर्फमुळे भविष्यात अभ्यास करण्याकरिता येणाऱ्या मुलांवर मोठा परिणाम होणार आहे. या बाजूलाच शिवाजी नगर पालिका शाळेचा दरवाजा आहे. तो ही बंद करण्यात आला आहे. सध्या काम सुरू असल्यामुळे आवाज येतो. शिवाय टर्फ मैदानावर खेळणारी मुले यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रीय करता येत नाही.

काय आहे मागणी?
गोवंडी परिसरात कित्येक जागा आजही मोकळ्या आहेत. त्या जागांवर कौशल्य केंद्र आणि टर्फ बनवावे. त्यासाठी पालिकेने जागा द्यावी. वाचनालयाच्या जागेत वाचनालयच ठेवण्यात यावे, अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत स्थानिक नागरिक व वाचक नफिस अन्सारी यांनी पालिका उद्यान विभाग व मेंटनस विभाग व सह आयुक्त यांच्यासोबत पत्रव्यवहार केला आहे. लायब्ररी आणि शाळेजवळ टर्फ तयार करणे हे नियमांचे उल्लघन असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे.

संस्थेला २०१९ मध्ये ही जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. मात्र अजूनही त्यांच्याकडे जागेचा ताबा आहे. वाचनालयाच्या रचनेत बदल करताना नियमाचे सर्रासपणे उल्लंघन सुरू आहे. शेवटी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा.
- फैयाज आलम शेख, सामाजिक कार्यकर्ते

वाचनालयाच्या जागेत कौशल्य केंद्र व टर्फ बनविणे योग्य नाही. यामुळे वाचनालयात येणाऱ्या वाचकांची संख्या कमी होईल. पालिकेला याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, ते दुर्लक्ष करीत आहेत.
- नफिस अन्सारी, वाचक

याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडून माहिती घेण्यात येईल. त्‍यानंतर त्‍याबाबत निर्णय होईल.
- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

कौशल्य केंद्र व टर्फ बनविल्यामुळे वाचनालयात येणारी विद्यार्थ्यांची संख्या 20 ते 30 वर आलेली आहे. वाचनालयाचे अस्तित्व नष्ट करण्याचा डाव रचला जात आहे.
- तन्वीर इंजिनिअर, वाचक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com