९ ऑगस्टला दिबांच्या नावाचे फलक लावणार

९ ऑगस्टला दिबांच्या नावाचे फलक लावणार

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. १० : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जो ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मंजूर केला आहे, त्याची अंमलबजावणी व्हावी, यासाठी राज्य सरकारने तो त्वरित केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घ्यावा, अशी एकमुखी मागणी येथे झालेल्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या सभेत करण्यात आली.
लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, नाशिक आदी जिल्ह्यांतील कार्यकत्यांची सभा शनिवारी दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल, उरण आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी सभेतील सर्व वक्त्यांनी ही मागणी केली. दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला द्यावे, असा ठराव राज्य सरकारने विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात करून आज वर्षभराचा काळ उलटून गेला आहे. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे पाठवून मंजूर करून घेतला नाही. राज्य सरकारने या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या भावनांचा विचार करून हा ठराव त्वरित केंद्राकडे पाठवून तो मंजूर करून घ्यावा. याबाबतचे एक निवेदन कृती समितीतर्फे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना लवकरच त्यांची भेट घेऊन देण्याचे यावेळी ठरले. यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी नवी मुंबई विमानतळाच्या जागेवर लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाचा नामफलक समितीतर्फे लावण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. तसेच दि. बा. पाटील विमानतळ नामकरण आंदोलनात भाग घेतलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती करणारे निवेदन देण्याचेही ठरले. या सभेला दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्व पक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सल्लागार माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जे. एम. म्हात्रे, सरचिटणीस भूषण पाटील, दीपक म्हात्रे, चिटणीस राजेश गायकर, खजिनदार जे. डी. तांडेल, विनोद म्हात्रे आदी मान्यवर सभेस उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com