खर्डीला सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा

खर्डीला सुसज्ज ग्रामीण रुग्णालयाची प्रतीक्षा

Published on

खर्डी, ता. १० (बातमीदार) : मुंबई-आग्रा महामार्गावरील खर्डी नाक्याजवळ खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम पूर्ण झाले आहे, पण या इमारतीचे उद्‌घाटन न करताच जुन्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत कार्यरत १५ कर्मचाऱ्यांना घेऊनच हे रुग्णालय नवीन इमारतीत सुरू केले जाणार आहे. पण या नवीन इमारतीत २०० खाटा बसण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे येथे कमीत कमी ५० खाटांचे रुग्णालय व ट्रामा केअर सेंटर सुरू करून येथे कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
खर्डी ग्रामीण रुग्णालय हे खर्डी रेल्वेस्थानक व मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे अपघातग्रस्त व परिसरातील रुग्णांना तत्काळ उपचार मिळत असल्याने येथे मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. त्यामुळे या रुग्णालयावरील भार हलका व्हावा, यासाठी २०० खाटा बसतील इतकी मोठी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सध्या जुन्या खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत ३० खाटांची मंजुरी व २५ कर्मचारी मंजूर आहेत; परंतु सध्या येथे १५ कर्मचारी उपलब्ध असून येथील कर्मचारी रोज २०० च्या आसपास रुग्णांचा गाढा ओढत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येत आहे. त्यामुळे या रुग्णालयाची क्षमता वाढवण्यासोबतच येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, जेणेकरून रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळतील, असे नागरिकांतून सांगण्यात येत आहे.
--------
१७ पदे रिक्त
खर्डी ग्रामीण रुग्णालय सध्या ३० खाटांचे मंजूर आहे, पण त्यात फक्त १५ खाटा उपलब्ध असून २५ मंजूर कर्मचाऱ्यांपैकी आठ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. वैद्यकीय अधिकारी (३), वरिष्ठ लिपिक (१), अधिपरिचारिका(५), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी (१), क्ष किरण तंत्रज्ञ (१), कक्षसेवक (४), सफाई कामगार (१) आणि शिपाई (१) असे एकूण १७ पदे रिक्त आहेत.
------
खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत रुग्णालय सुरू करताना हे रुग्णालय ५० खाटांचे करून कर्मचारी संख्या वाढवणे गरजेचे आहे.
- गणेश राऊत, तालुका विस्तारक, शिवसेना (ठाकरे गट), शहापूर
----
खर्डीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या इमारतीत मंजूर कर्मचारी उपलब्ध करून ५० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
फोटो- खर्डी ग्रामीण रुग्णालयाची जुनी व नवीन इमारत. (छायाचित्र- नरेश जाधव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.