पेण, दादर खाडीत हजारो लिटर डिझलसह बोट जप्त

पेण, दादर खाडीत हजारो लिटर डिझलसह बोट जप्त

Published on

पेण, ता. १० (वार्ताहर) : पेण तालुक्यातील दादर खाडीत अवैध धंदे सुरू असून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बेकायदेशीर विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या हजारो लिटर डिझलसह पंढरीनाथ शक्ती नावाची बोट जप्त करण्यात आली. यामध्ये एकूण १४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला असल्याची नोंद दादर सागरी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखा अलिबाग येथील पोलिस हवालदार राजेश पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पेण तालुक्यातील दादर गावातील दादर बेडी येथील खोशीमध्ये आरोपी विजय रामनाथ नाईक (वय-४२) याने मुंबई येथील विकी, पंडित, मोनुसिंग, इब्बू यांच्या मदतीने विनापरवाना ६ हजार लिटर डिझेल चोरुन आणुन साठा करून ठेवला होता. सदर लपवून ठेवलेल्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून डिझेल जप्त केले आहे. या कारवाईत १० लाख रुपये किंमतीचे पंढरीनाथ शक्ती नावाची फायबर बोट, ४ लाख ८० हजार रुपये किंमतीचे ८० रुपये प्रति लिटर प्रमाणे एकुण ६ हजार लिटर डिझेल असा एकूण १४ लाख ८० हजार रुपये किमतीचा एकुण मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी दादर सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबागचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, पोलिस हवालदार राजेश पाटील, संदीप पाटील, यशवंत झेमसे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, पोलिस नाईक सचिन वावेकर, ईश्वर लांबोटे यांनी व दादर सागरी पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.