धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Published on

बदलापूर, ता. १० (बातमीदार) : पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी बदलापुरातील प्रसिद्ध कोंडेश्वर येथील भोज धरणात घडली. रोहित मुकेश गोहेर (वय २७) असे मृत तरुणाचे नाव असून तब्बल १५ तासांनंतर सोमवारी (ता. १०) त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले.
उल्हासनगर येथील पाच ते सहा तरुण रविवारची भोज धरणावर सहलीला आले असताना काही तरुण पोहण्यासाठी धरणात उतरले. धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने या समूहातील रोहित पाण्यात बुडाला. तब्बल १५ तासांनंतर रोहितचा मृतदेह बाहेर काढून अग्निशमन दलाने बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केला. रोहित पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या मित्रांनी गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी लगेचच अग्निशमन दलाला पाचारण केले. बदलापूर अग्निशमन दलाला ही माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी भागवत सोनोने यांनी त्यांच्या टीमसह संध्याकाळी या धरणात शोधमोहीम सुरू केली. अंधार वाढल्याने मोहीम थांबवण्यात आली. सकाळी येथील आदिवासी पाडा धामणगाव येथील काही पट्टीचे पोहणारे व मासेमारी व्यवसाय करणाऱ्या तरुणांना सोबत घेत अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह शोधून काढल्याची माहिती सोनोने यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.