नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात होणार संगीताची बरसात

नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात होणार संगीताची बरसात

Published on

मुंबई, ता. १० (बातमीदार) : सांस्कृतिक केंद्र आणि चित्र-शिल्प कलेचे प्रसिद्ध दालन म्हणून वरळीच्या नेहरू सेंटरची ओळख आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणे ही या केंद्राची अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे मुंबईकरांना नाटक, नृत्य, संगीत, गायन, लोककला यांचा मनमुराद आनंद येथे घेता येतो. बाहेर पाऊस रिमझिम बरसतो आहे आणि बंदिस्त नाट्यगृहात शास्त्रीय संगीताच्या बाजातली पाऊसगाणी ऐकायला मिळाली तर ती रसिक प्रेक्षकांना हवी असतात. रसिकांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नेहरू सेंटरने यंदा ‘मेघ मल्हार’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे.

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात पाऊस बरसायला लागलेला आहे. संपूर्ण मुंबई या पावसाने भिजून चिंब झाली आहे. यंदा या केंद्राने पावसाचे निमित्त घेऊन दोन दिवसांचा ‘मेघ मल्हार’ या शास्त्रीय गाण्यांच्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी १४ आणि शनिवारी १५ जुलै या दिवशी हा महोत्सव होणार आहे. शास्त्रीय संगीतात उज्ज्वल परंपरा जपणाऱ्या ज्येष्ठ, श्रेष्ठ गायकांना यासाठी निमंत्रित केले आहे. यात सानिया पाटणकर, पं. सुरेश बापट यांचा पहिल्या दिवशी; तर ओंकार दादरकर, विदूषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचा दुसऱ्या दिवशी महोत्सवात सहभाग असणार आहे. रोज सायंकाळी ७ वाजता होणारा हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी विनामूल्य आहे. वरळीच्या नेहरू सेंटरच्या नाट्यगृहात ही संगीताची बरसात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

सेंटरच्या तिकीट खिडकीवर या विनामूल्य प्रवेशिका उपलब्ध करण्यात आल्या आहेत. प्रत्येक गायकाची स्वतःची अशी गाण्याची शैली आहे. जी त्यांनी गुरूकडून अवगत केलेली आहे. भारतात, परदेशात त्यांनी अनेक शास्त्रीय संगीतांचे कार्यक्रम करून स्वतःचा असा रसिकवर्ग निर्माण केलेला आहे. या कामासाठी त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. हे सर्व गायक नेहरू सेंटरच्या दोन दिवसांच्या महोत्सवात सहभागी होणार आहेत. राणी वर्मा आणि श्रुती रानडे हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.