मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह दोघे अटकेत

मुंबई विमानतळावर परदेशी चलनासह दोघे अटकेत

Published on

मुंबई, ता. १० : परदेशी चलन बेकायदेशिररित्या थायलंडला घेऊन जाणाच्या प्रयत्नात असलेल्या दोन परदेशी नागरिकांना सीमाशुल्क विभागाने शनिवारी (ता. ८) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरून अटक केली. अटक आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून सव्वाकोटी रुपये किमतीचे अमेरिकन डॉलर जप्त केले असून याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकोटो टानी (जपान) व गुन्यापुनईसा फूनासेट (थायलंड) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांकडून १०० अमेरिकन डॉलरच्या १,४१५ नोटा जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत १ कोटी १५ लाख ३९ हजार रुपये असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.