श्रमजीवी जनता क्लिनिकचा मजूरांसह गरिबांना आधार

श्रमजीवी जनता क्लिनिकचा मजूरांसह गरिबांना आधार

Published on

वज्रेश्वरी, ता. ११ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील अंबाडी नाका येथे सुरू असलेले श्रमजीवी जनता क्लिनिक तब्बल १२ हजार आदिवासी मजूर आणि गरीब मजूर रुग्णांसाठी आधार ठरले आहे. श्रमजीवीचे युवा नेते प्रमोद पवार यांच्यासह श्रमजीवी तरुणांनी हा उपक्रम मागील वर्षी सुरू केला होता. या रुग्णालयात केवळ दोन रुपये फी घेत हजारो रुग्णांना आरोग्य सेवा आणि औषधे दिली जात आहेत.
विवेक पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २३ ऑगस्ट २०२२ रोजी श्रमजीवीच्या युवा कार्यकर्त्यांनी अंबाडी नाका येथे श्रमजीवी जनता क्लिनिक सुरू केले. यासाठी प्रमोद पवार आणि मित्रपरिवाराने स्वखर्चाने येथे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि औषधे उपलब्ध करून देण्यात आली. येथे येणाऱ्या रुग्णांकडून केवळ दोन रुपये फी आकारली जाते. या दोन रुपयांत तपासणी आणि औषधे देखील दिली जातात. शासकीय रुग्णालयापेक्षा कमी फीमध्ये येथे उपचार दिले जातात. डॉ. पल्लवी जाधव यांनी या क्लिनीकमध्ये अल्प मोबदल्यात रुग्णसेवा देत आहेत. अंबाडी नाका येथे जव्हार मोखाडा तसेच परराज्यातूनदेखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर येत असतात. त्यांच्याकडे खासगी रुग्णालयात उपचाराला पैसे नसतात, अशा परिस्थितीत हे क्लिनिक गोरगरीब आणि स्थलांतरीत रुग्णांना आधार ठरत आहे. आतापर्यंत या क्लिनिकच्या माध्यमातून १२ हजार रूग्णांना सेवा मिळाली आहे.
…..
मोफत रुग्णवाहिका सेवा
क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोफत रुग्णवाहिका, सवलतीच्या दरात सोनोग्राफी, सीटी स्कॅन, रक्त तपासणी इत्यादी सेवा दिल्या जातात. तसेच पुढील उपचारासाठी ८०० पेक्षा जास्त रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवण्यात आले असून तेथेही या रुग्णांवर सवलतीत सेवा मिळवून देण्यात श्रमजीवी जनता क्लिनिकला यश आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.