कॉलम

कॉलम

पेन्स फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
कासा (बातमीदार) : गॅलनपाडा आणि ठाकरपाडा येथील जिल्हा परिषद शाळांत पेन्स सहयोग फाऊंडेशन यांच्या वतीने १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी डहाणू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एन. गुरोडे, केंद्रप्रमुख सोनुसिंग पाटील, रँक ऑर्गनिक प्रायव्हेट लिमिटेडचे एस. तोरडमल, पेन सहयोग फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश सावे, दीप्ती सावे, तसेच गंजाड ग्रामपंचायतीचे सदस्य विनोद गडग, कल्पेश ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुकर गोलिम, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अधिकारी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. केंद्रामधील विद्यार्थ्यांना अजून मदत करण्याचे आवाहन केले. उपस्थित पाहुण्यांनीदेखील भविष्यात आणखी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.
-------
सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात वनमहोत्सव
पालघर (बातमीदार) : महाराष्ट्र सरकारने ७ जुलै हा दिवस वनमहोत्सव म्हणून घोषित केला आहे. या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जाते. त्या अनुषंगाने सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि पालघर वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पडघे येथे मुलांनी २५० वृक्षांची लागवड करून वनमहोत्सव साजरा केला. या वेळी वन अधिकारी गणेश परहर यांनी विद्यार्थांना विविध प्रकारच्या वृक्षांची माहिती देऊन त्यांची उपयुक्तता समजावून सांगितली. तसेच विद्यार्थांना निसर्गाचे संवर्धन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. याप्रसंगी वन विभागाचे वनपाल जी. एस. पडवळे, अनिल माढे, तसेच वन विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रोहित गायकवाड, डॉ. अरुंधती बर्डे, डॉ. संगीता ठाकूर आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
---------
अशोक कीर्तने यांच्या शिष्यांची सांगीतिक मैफल
विरार (बातमीदार) : ज्येष्ठ संगीतकार अशोक कीर्तने यांच्या सांगितिक कारकीर्दीचा सन्मान करता यावा आणि त्यांनी अनेक वर्षे संगीतप्रेमी विद्यार्थ्यांना दिलेल्या विद्येप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी, या उद्देशाने रविवारी (ता. १६) सायंकाळी साडेचार वाजता वसई पश्चिमेतील पारनाका येथे बाजीपूर वनिता विद्यालयात मैफल आयोजित करण्यात आली आहे. कीर्तने यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि उषा मंगेशकर, रवींद्र साठे, उत्तरा केळकर, अशोक खोसला, मिलिंद इंगळे यासारख्या गायकांनी गायलेल्या संगीतरचना त्यांच्या शिष्यवृंदाद्वारे सादर होणार आहेत. हा कार्यक्रम सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी विनामूल्य आहे. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि अशोक कीर्तने यांच्या अप्रतिम संगीत रचनांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन अशोक कीर्तने यांच्या शिष्यांकडून करण्यात आले आहे.
-------
मुख्याध्यापक सुरेश कनोजा यांचा सन्मान सोहळा
विक्रमगड (बातमीदार) : ओंदे येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापक सुरेश लक्ष्मण कनोजा यांचा संस्थेकडून सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व्ही. जी. पाटील, संस्थेचे सचिव मिलिंद पाटील, संस्थेचे संचालक डॉ. सुधाकर पाटील, संस्थेचे संचालिका वंदना पाटील, पोलिस उपनिरीक्षक सतीश जगताप, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चेतना पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. सुधाकर पाटील यांनी भूषविले. सुरेश कनोजा यांचा सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आले. व्ही. जी. पाटील यांनी कनोजा गुरुजींच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी संस्थेला दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
--------
विक्रमगडमध्ये अबॅकस विद्यार्थी गुणगौरव समारंभ
विक्रमगड (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी ॲचिव्हर्स ॲकॅडमी आयोजित मेमरी डेव्हलपमेंट सेमिनार आणि अबॅकस विद्यार्थी गुणगौरव समारंभ आमराई गार्डन येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे सुनील सावंत, अमित घोडके, नाना खरपडे, भरत पष्टे आदी मान्यवर उपस्थित होते. या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना कशाप्रकारे अभ्यास करावा, कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा, अभ्यासाचे नियोजन कसे करावे, पाठांतर कसे करावे, यावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सुनील सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचे ॲचिव्हर्स ॲकॅडमीचे संचालक गणेश सांबरे आणि ग्रीष्मा सांबरे यांनी आभार व्यक्त केले.
---------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com