मैत्रिणीची बदनामी कराणारा झोमॉटोचा डिलीव्हरी बॉय गजाआड

मैत्रिणीची बदनामी कराणारा झोमॉटोचा डिलीव्हरी बॉय गजाआड

अंधेरी, ता. ११ (बातमीदार) ः मालाड येथे राहणाऱ्या मैत्रिणीचा विनयभंग, तसेच सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी अदुल शेख ऊर्फ मोहम्मद अब्दुल अशरफ अली शेख या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. मैत्री तोडली म्हणून बदनामी करण्याच्‍या उद्देशाने त्याने अश्‍लील साईटवर तिचा फोटोसह मोबाईल क्रमांक अपलोड केल्याचे तपासात उघड झाले आहे. तक्रारदार तरुणी ही मालाड परिसरात राहते. सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे इंस्‍टाग्रामवर एक अकाऊंट आहे. कोरोना काळात तिची अब्दुल शेखशी ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती. अनेकदा ते मोबाईल आणि इंस्‍टाग्रामवर एकमेकांच्या संपर्कात राहत होते. काही दिवसांपूर्वी तिला अदुल हा विवाहित असून त्याला मुले असल्याची माहिती समजली होती. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि तिने त्याच्याशी असलेले संबंध तोडून टाकले होते. याचा त्याच्या मनात राग होता. याच रागातून त्याने तिचे फोटोसह मोबाईल क्रमांक एका अश्‍लील सोशल साईटवर व्हायरल करून तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा फोटो आणि मोबाईल क्रमांक अपलोड झाल्यानंतर तिला अनेकांचे फोन येऊ लागले. ते तिच्याशी अश्‍लील संभाषण करत होते. त्यामुळे तिने बांगुरनगर पोलिस ठाण्यात याबद्दल तक्रार दिली होती. या तक्रारीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी गंभीर दखल घेत एपीआय विवेक तांबे यांच्याकडे तपासाचे आदेश दिले होते. या तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विनयभंगासह बदनामी करणे, अश्‍लील संभाषण करणे तसेच आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी अब्दुल शेख ऊर्फ मोहम्मद अब्दुल शेख याला वांद्रे येथून ताब्यात घेतले. तपासात आरोपी हा वांद्रे येथे राहत असून झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत असल्‍याचे पुढे आले. तक्रारदार तरुणीने त्याच्याशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध तोडून टाकल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्यानेच तिचे फोटो आणि मोबाईल क्रमांक अश्‍लील साईटवर अपलोड केल्याची कबुली दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com