उरण परिसरात विजेचा लपंडाव

उरण परिसरात विजेचा लपंडाव

उरण, ता. ११ ः एकीकडे पावसाने विश्रांती घेतली आहे. अशातच दुसरीकडे उरण परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा बंद करावा लागत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे; मात्र पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीची कामे केली नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याची नाराजी उरणकरांमधून व्यक्त होत आहे.
उरण शहर तसेच परिसरात विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नवीन नाहीत; मात्र उरण शहर व परिसरात विजेचा खेळखंडोबा पाचवीला पुजला आहे. वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे उरण परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. कोणतेही कारण नसताना शहराच्या विविध भागांत वीजप्रवाह वारंवार खंडित करण्याचे प्रकार महावितरणकडून होत आहेत. सतत घडणाऱ्या प्रकारांमुळे उरण परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. बऱ्याचदा दुपारी वीज जात असल्याने विजेची उपकरणे खराब होत आहेत. तसेच रात्रीही वीज नसल्याने नागरिकांची झोपमोड होत आहे. महत्त्वाचे म्हणजे आठवड्यातून एकदा देखभाल दुरुस्तीसाठी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच इतर दिवशीही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने महावितरणविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
---------------------------------------------
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यामुळे दैनंदिन आयुष्यावर त्याचा परिणाम होत आहे. यामुळे घरातील विद्युत उपकरणेदेखील खराब होत आहेत. त्यामुळे महावितरणने या समस्येकडे लक्ष द्यावे.
- मिलिंद पाटील, रहिवासी, उरण
----------------------------------
उरण परिसरात विजेच्या तारा भूमिगत नाहीत. वारा जास्त असल्याने लाईन फिडरला ट्रीप होते. त्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होतो; मात्र महावितरणचे कर्मचारी त्वरित दुरुस्ती करतात.
- विजय मिश्रा, उपअभियंता महावितरण, उरण-जासई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com