कच्चा मालाच्या किंमती वाढल्याने गणेशमूर्ती महागणार

कच्चा मालाच्या किंमती वाढल्याने गणेशमूर्ती महागणार

Published on

डोंबिवली, ता. ११ (बातमीदार) : गणेश चतुर्थीला केवळ दोन महिने आहेत. त्यामुळे कारखान्यांत मूर्ती कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. मूर्तीचे रंगकाम जोरात सुरू आहे. अशातच आता कच्चा मालाच्या किमती वाढल्याने गणेशमूर्ती महागणार आहेत. यंदा गणेशमूर्तीच्या दरात पाचशे ते हजार रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व खर्च वाढल्यामुळे या सर्व बाबींमुळे गणेशमूर्तीच्या दरात वाढ झाल्याची पहायला मिळत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस आणि पर्यावरणपूरक मूर्तींमध्ये एक फुटामागे पाचशे ते हजार रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती गणेशमूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांत पेणवरून मोठ्या प्रमाणात गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होतात. गणेश उत्सव दोन महिन्यांवर आला असून मूर्ती घडवण्यात कलाकारांचे हात गुंतलेले आहेत. रंगकामाला सुरुवात झाली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी शाडूची माती, रंग, पीओपी, ब्रश, वाहतूक खर्च याचबरोबर वाढलेला कामगारांचा पगार याचा परिणाम गणेशमूर्तीच्या दरावर झाला आहे. मागील वर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती दीड हजार रुपयाला उपलब्ध होती. यावर्षी दोन हजार रुपयाला उपलब्ध आहे; तर शाडूची मूर्ती गेल्या वर्षी दोन हजार रुपयाला विक्री करण्यात आली होती. यंदाही मूर्ती अडीच ते तीन हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती अशी माहिती गणेशमूर्ती विक्रेत्यांनी दिली.

गणेशमूर्तींचे आतापर्यंत २० टक्के बुकिंग झाली आहे. गणपतीचा महिना जसा जवळ येईल तसा बुकिंगचा वेग वाढेल. आमच्याकडे लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती उपलब्ध आहेत, असे मूर्तिकारांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.