यश संपादन करण्यासाठी वाचन महत्त्वाचे

यश संपादन करण्यासाठी वाचन महत्त्वाचे

Published on

ठाणे, ता. ११ (बातमीदार) : कोणत्याही क्षेत्रात काम करायचे असेल, यश संपादन करायचे असेल, तर वाचन खूप महत्त्वाचे आहे, असे मत कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील सानियाची भूमिका साकारणारी अभित्रेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेते कमलाकर सातपुते यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली. ‘सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३’ या स्पर्धेअंतर्गत कळव्यातील सहकार विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
‘सकाळ स्कॉलर प्रश्नमंजुषा २०२३’ ही स्पर्धा १ जुलैपासून सुरू झाली असून या स्पर्धेत स्मार्ट वॉच, गिअरची सायकल, क्रिकेटचे किट, स्कूल बॅग, कंपास बॉक्स व उत्तेजनार्थ टिफीन बॉक्स अशा एक कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या तब्‍बल २४ हजारांहून अधिक बक्षिसांचा समावेश आहे. या स्पर्धेअंतर्गत कळव्यातील सहकार विद्यालयात मंगळवारी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि अभिनेते कमलाकर सातपुते यांनी उपस्थित राहून या शाळेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी या कलाकारांसाठी चर्चासत्राचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी जान्हवी आणि कमलाकर यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. समाजमाध्यमाच्या काळात गुरुशिष्य परंपरेला महत्त्व आहे का, असा प्रश्न जान्हवीला विचारताच जान्हवीने पटकन ‘हो’ असे उत्तर देत प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू असणे किती महत्त्वाचे असते, हे पटवून दिले; तर कोणत्याही गोष्टीला कधी नकार देऊ नये, नेहमी सकारात्मक विचार करावा, असा सल्ला कमलाकर सातपुते यांनी दिला; तर या चर्चासत्रासह छोटासा रॅपिड फायरचा राऊंडही या कार्यक्रमात पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी या कलाकारांच्या जीवनाशी निगडित विविध असे प्रश्न केले. यामध्ये तुमचा आवडता अभिनेता/अभिनेत्री कोण?, तुमचं आवडतं गाणं कोणतं?, तुम्हाला शाळेत असताना शिक्षकांचा ओरडा मिळाला आहे का? असे विविध गंमतीशीर प्रश्न विचारून विद्यार्थ्यांनी या दोघांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या; तर या कलाकारांनीदेखील विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आनंदाने दिली. या कार्यक्रमात सहकार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती सावंत तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होते; तर हा कार्यक्रम विभागप्रमुख विजय शिंदे आणि भूषण पाटील यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.
-----
‘सकाळ’ हे एकमेव वृत्तपत्र असे आहे की, जिथे पत्रकारितेसह ‘सकाळ स्कॉलर’सारखे विविध उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढत असून त्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत असते.
- कमलाकर सातपुते, अभिनेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.