आता टाटा बनविणार आईफोन

आता टाटा बनविणार आईफोन

मुंबई, ता. ११ : देशातील एक मोठी कंपनी आयफोन बनवण्याच्या क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. आता टाटा कंपनी आयफोन निर्मिती करणार असल्याचे समजते. यासाठी ती अॅपलची पुरवठादार कंपनी विकत घेणार आहे. हा करार येत्या ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. माहितीनुसार टाटा कर्नाटकमधील विस्ट्रॅान कार्पोरेशनचा आयफोन निर्मितीचा प्लांट विकत घेणार आहे. हा करार ६० कोटी डॉलरपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. सध्यस्थितीत या प्लांटमध्ये १० हजारपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. नवा अॅपल-१४ हा मोबाईलही येथेच ॲसेम्बल केला जात आहे. येत्या आर्थिक वर्षात १.८ कोटी डॉलर किमतीचे आयफोन बनवण्याचा कंपनीचा मानस आहे. यावर कंपनीला सरकारी करातूनही सूट मिळण्याची शक्यता आहे. मूळची तैवानची विस्ट्रॉन कार्पोरेशन कंपनी आयफोन निर्मितीच्या व्यवसायातून आपला बाजार उठवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे टाटाला या क्षेत्रात आपला पाया मजबूत करायचा आहे. टाटा या कंपनीत कामगारांची संख्या तीन पटीने वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने कोविड काळानंतर चीनमधून स्थलातंरित होणाऱ्या कंपन्या भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. टाटाच्या करारामुळे यामध्ये ग्लोबल इलेक्ट्रॉनिक्स ही आंतरराष्ट्रीय कंपनी चीनवरील आपले अवलंबित्व कमी करून भारतात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाटांचा हा करार भारतासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com