मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे आज सत्याग्रह आंदोलन

मंत्रालयाजवळील गांधी पुतळ्यासमोर काँग्रेसचे आज सत्याग्रह आंदोलन

Published on

मुंबई, ता. ११ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपने सूडबुद्धीने कारवाई केली. खासदारकी रद्द करून राहुल गांधी यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. खोट्या तक्रारीच्या आधारे त्यांच्यावर कारवाई केली गेली. या दडपशाहीविरोधात तसेच राहुल गांधी यांच्या पाठीशी काँग्रेस खंबीरपणे उभा आहे हा संदेश देण्यासाठी उद्या (ता. १२) मुंबईत मंत्रालयाजवळील महात्मा गांधी पुतळ्यासमोर पक्षाच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे.

सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आमदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, विधान परिषद गटनेता सतेज पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड इत्यादींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनास उपस्थित राहणार असल्याचे काँग्रेसने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.