अमली पदार्थविरोधी मोहिमेत २४ तासांत ३६२ आरोपींवर कारवाई

अमली पदार्थविरोधी मोहिमेत २४ तासांत ३६२ आरोपींवर कारवाई

मुंबई, ता. ११ : मुंबई पोलिसांनी २४ तासांत अमली पदार्थांशी संबंधित आठ गुन्ह्यांची नोंद करत नऊ आरोपींना अटक केली आहे. अमली पदार्थ तस्करीविरोधी पोलिसांनी ९ ते १० जुलैदरम्यान राबवलेल्या मोहिमेत ३६२ जणांवर कारवाई केली आहे. कारवाईत पोलिसांनी एमडी, गांजा, चरस व हेरॉईन असे एकूण ४० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. मुंबई शहरातील सर्व पाचही प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त, १४ परिमंडळीय पोलिस उपआयुक्त, २८ विभागीय सहायक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांतील वरिष्ठ निरीक्षक व अधिकाऱ्यांनी एकत्रित शहरात कारवाई केली. अडीच महिन्यांत पोलिसांनी एकूण पाचशे गुन्हे दाखल करून ५६८ आरोपींना अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी २१९१ ग्रॅम गांजा, १९ ग्रॅम मेफेड्रोन आणि १६६ नायट्रोपोजम गोळ्या जप्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com