ट्रक-दुचाकी धडकेत दोघांचा मृत्यू

ट्रक-दुचाकी धडकेत दोघांचा मृत्यू

Published on

नळदुर्ग, ता. ११ (बातमीदार) ः ट्रक आणि दुचाकीची धडक होऊन दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर-हैदराबाद महामार्गावरील नळदुर्गजवळ मंगळवारी ही दुर्घटना घडली.
परिसरातील पाटीलतांडा येथील बालाजी श्रीमंत चव्हाण (वय ३०) व त्यांचा मित्र ईश्वर शंकर गायकवाड (३५, रा. चिकुंद्रा, ता. तुळजापूर) हे नुकत्याच खरेदी केलेल्या नव्या मोटरसायकलने जेवळी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी निघाले होते. त्या वेळी नळदुर्गजवळ ट्रक (एमएच १३ एएक्स ३४८८) व मोटरसायकलची धडक झाली. त्यात बालाजी चव्हाण व ईश्वर गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. महामार्ग विभागाचे पोलिस उपनिरीक्षक भीमसेन जाधव, पोलिस कर्मचारी संदीप सुरवसे, अमोल बनसोडे, दिगंबर कुंभार, महेश सुरवसे, रानबा गांधले यांनी दोन्ही मृतदेह नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.