५० हून अधिक गुन्ह्यात पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

५० हून अधिक गुन्ह्यात पाहिजे आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Published on

पन्नासहून अधिक गुन्ह्यांतील वाँटेड आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुंबई ः अंधेरीत राहणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाकडून दोन लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी एका २८ वर्षीय व्यक्तीला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपी फैजल अली ऊर्फ अलीमामा युसुफ अली शेख घाटकोपरचा रहिवासी आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याच्यावर ५६ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी आरोपी शेख आणि त्याच्या साथीदारांनी अंधेरीमध्ये एका ६० वर्षीय महिलेला लुटले होते. शेखने साथीदारासह तिचे ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि १३ ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावून घटनास्थळावरून पळ काढला होता. तपासादरम्यान आरोपीच्या साथीदाराला अटक करण्यात आली; मात्र पोलिसांना शेखचा माग काढता आला नाही. त्यानंतर शेखचा निवासी पत्ता शोधण्यात पोलिसांना यश आले. अनेक दिवस पाळत ठेवल्यानंतर सोमवारी पोलिसांनी त्याला अटक केली. तपासादरम्यान पोलिसांना त्याच्यावर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ५६ हून अधिक खटले दाखल असल्याची माहिती मिळाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.