चारचाकी वाहनांसाठी नवी मालिका

चारचाकी वाहनांसाठी नवी मालिका

Published on

नवीन पनवेल (वार्ताहर)ः चारचाकी वाहनासाठी एमएच ४६ सीएम MH४६CM ही नवीन मालिका येत्या काही दिवसांमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल येथे सुरू करण्यात येणार आहे; तरी उरण, पनवेल, कर्जत, खालापूर या पनवेल परिवहन विभागात इच्छुक वाहनधारकांनी या मालिकेतील आकर्षक क्रमांक शासकीय नियमांनुसार शुल्क भरून आरक्षित करता येऊ शकतो, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. या मालिकेतील एक या क्रमांकासाठी इच्छुकांकडून निविदा मागवण्यात येणार आहेत. तसेच पसंतीचा क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. मोटर वाहन नियम १९८९ च्या नियमानुसार आकर्षक, अनाकर्षक नोंदणी क्रमांक करायचे असतील, त्यांनी पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.