बेलपाडा भुयारी मार्गात कोंडी

बेलपाडा भुयारी मार्गात कोंडी

Published on

खारघर, ता. १८ (बातमीदार) : खारघर परिसरातील रहिवासी आपली वाहने स्थानक परिसरात उभी करून मुंबई, ठाणे तसेच इतर ठिकाणी प्रवास करतात; तर बहुतांश प्रवासी रिक्षाने प्रवास करत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या खारघर रेल्वे स्थानकाशेजारी असलेल्या बेलपाडा भुयारी मार्गात तीन फूट पाणी भरल्याने कोंडी होत आहे.
बेलपाडा भुयारी मार्गात पाणी भरल्यामुळे पाण्यातून वाहने काढताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. या भुयारी मार्गात तुंबलेल्या पाण्यातूनच काही प्रवाशांनी कार; तर काहींनी रिक्षा घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यामुळे अनेक वाहनात पाणी गेले असून काही वाहने बंददेखील पडली होती. त्यामुळे पालिकेने वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर अशी परिस्थिती उद्भवली नसती, अशी नाराजी स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
-----------------------------------------
पालिकेला उशिराचे शहाणपण
या भुयारी मार्गात दर वर्षी सिडको पंप लावून पाण्याचा निचरा करत होती; मात्र पनवेल महापालिकेकडे हस्तांतर झाल्यानंतर याकडे दुर्लक्ष झाल्याने अशी परिस्थिती ओढवल्याचे स्थानिकांनी सांगितले; तर याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता पाणी निचरा करण्यासाठी पंप लावण्यात आल्याची माहिती दिली गेली.
-------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.