किरीट सोमय्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निदर्शने

किरीट सोमय्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून निदर्शने

Published on

चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी त्‍यांच्या वर गुन्हा दाखल करून त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीकरिता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने चेंबूर नाका शिवसेना शाखेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली; तर राष्ट्रवादीकडून त्‍यांना कपडे व अंतर्वस्‍त्र भेट देण्यात येणार आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे काही व्हिडीओ क्लिप सोमवारी एका वृत्तवाहिनीवर व्हायरल झाले होते. याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना शाखेसमोर किरीट सोमय्या यांच्याविरोधात निदर्शने करीत त्‍यांच्‍या फोटोला चप्पलने चोप देत निषेध व्यक्त केला आहे. किरीट सोमय्या यांच्या अशा कृत्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, याकरिता शिवसेनेच्या नेत्यांनी चेंबूर पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. या वेळी विभागप्रमुख प्रमोद शिंदे, शाखाप्रमुख, पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते; तर दुसरीकडे मुंबई प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने किरीट सोमय्या यांना ‘एक हाथ मदतीचा’ उपक्रमाअंतर्गत कपडे व अंतर्वस्त्र भेट पाठविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ॲड. नीलेश भोसले यांनी दिली. या वेळी जिल्हाध्यक्ष शाहरुख शाह, सचिन नारकर, इरफान दिवटे, हरीश गायकवाड, मेहुल जाधव मुंबई उपाध्यक्ष (प्रशासन) अमित हिंदलेकर, तालुकाध्यक्ष संतोष पवार, अनिकेत मंडळू, राहुल साळवे अदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.