नवी मुंबईत अपघात सत्र

नवी मुंबईत अपघात सत्र

Published on

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या दोन दिवसांत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिकासह एक तरुण तसेच एका तरुणीचा समावेश असून दोन अपघातातील वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाले असल्याने पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
घणसोली येथील शेतकरी शाळेसमोर झालेल्या अपघातात पूजा राजपुरोहित (२१) या तरुणीला भरधाव डम्परने धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. पूजा घणसोली गावात कुटुंबासह राहत होती. शनिवारी (ता. १५) रात्री घणसोली नाका येथून पायी घरी परतत असताना शेतकरी शाळेच्या गेटजवळ भरधाव वेगात आलेल्या डम्परने तिला धडक दिली होती. या घटनेत डम्परचालक रमेशकुमार महतो (५०) याला रबाळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; तर त्याच दिवशी मध्यरात्री सायन-पनवेल मार्गावर उरण फाटा येथील उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात रबाळे एमआयडीसीतून लोणावळा येथे निघालेल्या तरुणांच्या स्कुटीला एका वाहनाने धडक दिली होती. या अपघातात स्कुटीवर पाठीमागे बसलेला ईश्वर ऊर्फ विशाल तेलगेचा (२१) घटनास्थळावर मृत्यू झाला होता. तर रविवारी (ता. १७) दुपारी ऐरोली येथे झालेल्या तिसऱ्या अपघातात बाळू गायकवाड (६२) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ऐरोली सेक्टर-९ मध्ये दिवा कोळीवाडा येथे कुटुंबासह राहणारे बाळू गायकवाड मुलुंड-ऐरोली रस्ता ओलांडताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली होती. मुंबईतील जे. जे. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
---------------------------------
दोघा वाहनचालकांचा शोध सुरू
या अपघातानंतर स्कुटीचालक तरुण त्या ठिकाणावरून पळून गेला; तर हरीश झोडे हा त्याच ठिकाणी थांबला. यावेळी तरुण मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत आढळून आला. या अपघाताप्रकरणी नेरूळ पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे; तर ऐरोलीतील अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला असल्याने रबाळे पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.