नेरुळमधून दोन बालकामगारांची सुटका

नेरुळमधून दोन बालकामगारांची सुटका

Published on

नवी मुंबई, ता. १८ (वार्ताहर) : गॅरेजमध्ये छापा टाकून तेथे काम करणाऱ्या दोन बाल कामगारांची सुटका करण्यात आली. नेरूळमधील शिरवणे भागामध्ये असणाऱ्या दोन गॅरेजवर नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली. बाल कामगारांना कमी वेतनात अतिश्रमाचे काम देऊन त्यांना राबवून घेणाऱ्या दोन्ही गॅरेज मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेरूळमधील शिरवणे भागातील गॅरेजमध्ये बाल कामगारांना कामावर ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडून अतिश्रमाचे काम करून घेण्यात येत असल्याचे तसेच त्यांना कमी वेतनात राबवून घेण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल आहेर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गॅरेजवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने शिरवणे येथील दुर्गा मोटार वर्क्स गॅरेजवर छापा मारला. या वेळी गॅरेजमध्ये १३ वर्षीय मुलगा काम करताना आढळून आला. त्यानंतर त्याच भागात असलेल्या एएम कार वॉशिंग सेंटरवर छापा मारला. या ठिकाणीदेखील १६ वर्षांचा मुलगा काम करताना आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मुलांची सुटका केली.

-------------
दोन्ही गॅरेजमालकांवर गुन्हा
दोन्ही गॅरेजच्या मालकांनी बाल कामगारांना कमी वेतनामध्ये कामाला ठेवून त्यांच्याकडून जास्त श्रमाचे काम करून घेऊन त्यांचे आर्थिक व शारीरिक शोषण केल्याचे आढळून आले. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दुर्गा मोटार वर्क्स या गॅरेजचा मालक अब्दुल शरीफ राईन (३७) व एएम कार वॉशिंग सेंटरचा मालक तैयब मंजुर कुरेशी (३२) या दोघांविरोधात नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.