आटगाव रेल्वे स्थानकात रेल्वे इंजिनात बिघाड

आटगाव रेल्वे स्थानकात रेल्वे इंजिनात बिघाड

Published on

शहापूर, ता. १८ (बातमीदार) : कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील आटगाव स्थानकावर डाऊन मार्गावर मंगळवारी (ता. १८) सकाळी आठच्या सुमारास गोरखपूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे दोन तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
मध्य रेल्वेच्या आटगाव स्थानकावर मंगळवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास डाऊन मार्गावर गोरखपूर एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यानंतर तातडीने कसारा येथून नवीन इंजिन आल्यानंतर तब्बल दोन तासांनी रेल्वे वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली. यादरम्यान ७.०९ ची कसारा लोकल रद्द करून आसनगाव स्थानकामधून मुंबईला रवाना करण्यात आली; तर डाऊन मार्गावरून धावणाऱ्या पंचवटी, काशी एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्यांचाही खोळंबा झाला. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तब्बल दोन तासांनी सव्वानऊच्या सुमारास वाहतूक पूर्ववत झाली. यादरम्यान अप मार्गावरून धावणाऱ्या जनता एक्स्प्रेसला टिटवाळ्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबा देण्यात आल्याने प्रवाशांची सोय झाली.

--------------
गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष
टिटवाळा ते कसारादरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, मालगाडी व एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड होणे, ओव्हरहेड वायर तुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. कल्याण-कसारा प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करत असते; मात्र या गंभीर घटनांकडे रेल्वे प्रशासन कायम दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना नेहमीच त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप संघटनेचे राजेश घनघाव यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.