घोडबंदर रोडवर बर्निंग कार

घोडबंदर रोडवर बर्निंग कार

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : नाशिककडून मुंबईला सोमवारी सकाळी निघालेल्या धावत्या कारला आग लागल्याची घटना ताजी असताना घोडबंदर रोडने वागळे इस्टेटकडे निघालेल्या धावत्या कारने घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलसमोर पेट घेतल्याची घटना मंगळवारी (ता. १८) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास घडली. एकीकडे पाऊस पडत असताना भरपावसात धावत्या कारने पेट घेतल्याने रस्त्यावर बर्निंग कारचे दृश्य पाहायला मिळाले. कारने पेट घेतल्याची ठाण्यातील चोवीस तासांतील ही दुसरी घटना आहे. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही; मात्र पेट घेतलेली कार जळून खाक झाली आहे.
मानपाडा येथील संजय पुराणिक हे मंगळवारी सकाळी मानपाडा येथून वागळे इस्टेट येथे जात होते. दरम्यान, घोडबंदर रोडवरील तत्त्वज्ञान विद्यापीठ सिग्नलवर येताच अचानक त्यांच्या कारने पेट घेतला. ही बाब लक्षात येताच पुराणिक यांनी गाडी रस्यावर उभी केली, पण आगीने काही क्षणांत रौद्ररूप धारण केल्याने आगीची झळ रस्त्यावर पार्क केलेल्या दुसऱ्या चारचाकी कारला बसली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कापूरबावडी वाहतूक पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि अग्निशमन दलाने धाव घेतली. त्यानंतर त्या आगीवर जवळपास दहा वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीत पुराणिक यांची कार जळून खाक झाली असून आनंद गुप्ता यांच्या कारला आगीची झळ लागल्यामुळे त्या कारचे फायबर मेल्ट होऊन किरकोळ नुकसान झाले आहे. आग लागली तेव्हा पुराणिक हे एकटेच प्रवास करत होते. तसेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.