अंधेरी पूर्वेत एक कोटींच्या वीज चोरीचा पर्दाफाश

अंधेरी पूर्वेत एक कोटींच्या वीज चोरीचा पर्दाफाश

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या दक्षता पथकाने अंधेरी पूर्व येथील प्लास्टिक मोल्डिंग व्यवसाय चालवणाऱ्या मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरर लिमिटेडविरुद्ध १.०९ कोटी रुपयांच्या वीजचोरीचा गुन्हा नोंदवला आहे. वीज कायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत गैररीत्या थेट पुरवठा केल्याबाबतचे प्रकरण दाखल झाले आहे. याबाबत पथकाने मोल्डिंग व्यवसायाचे मालक आणि अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे नोंदणीकृत ग्राहक असलेल्या पंकज वासुदेवन नायर यांच्याविरुद्ध खेरवाडी पोलिस ठाण्यात १५ जुलैला तक्रार दाखल केली आहे.
मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग मॅन्युफॅक्चरर लिमिटेडविरुद्ध संशयास्पद हालचाली दक्षता पथकाच्या निदर्शनास आल्या; परंतु त्यांना पुराव्यासह पकडण्यात यश आले नाही. त्यानंतर पथकाने योग्य नियोजनासह १३ जुलैला छापा टाकला आणि गैररीत्या केलेल्या थेट पुरवठा प्रकरणाचा अखेर छडा लावला. मेसर्स क्रोहास्ट प्लास्टिक मोल्डिंग कंपनीमध्ये संबंधित स्रोतातून तीन फेज थेट वीजपुरवठा जोडणी घेतली गेली. चार वर्षे आणि सात महिन्यांच्या कालावधीसाठी ५,६१,५९८ युनिटसाठी १,०९,८२,५४४ रुपये इतक्या किमतीची वीजचोरी उघडकीस आली आहे.
...
दुसरी मोठी घटना
वीजचोरी प्रकरणावर भाष्य करताना अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, सतर्कतेने महिनाभरात उघडकीस आणलेली चोरीची दुसरी मोठी घटना आहे. दक्षता पथकाने जून २०२३ मध्ये १.३३ कोटींच्या वीज चोरीचे प्रकरण उघडकीस आणले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजचोरी रोखल्याबद्दल आम्ही आमच्या पथकाचे अभिनंदन करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.