पालिकेने बुजवलेले खड्डे उखडले

पालिकेने बुजवलेले खड्डे उखडले

Published on

गोरेगाव, ता. १८ (बातमीदार) : पालिकेकडून जवाहर नगर येथील रस्‍त्‍यावरील खड्डे आठ दिवसांपूर्वी बुजवण्यात आले होते; मात्र दोन दिवसांच्‍या पावसामुळे येथील बुजवलेले खड्डे उखडल्‍याने रहिवाशांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे.
गोरेगावातील जवाहर नगर फाटक ते विहान बिल्डिंग, ऊसवाला लेन या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर वारंवार खड्डे निर्माण होत आहेत. ज्याचा रहिवाशांसह वाहनचालकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. त्‍यामुळे रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर पालिकेने मागील आठवड्यात येथील खड्डे बुजवले होते, परंतु ते काम तात्पुरत्या स्वरूपात केल्‍याने पुन्हा रस्त्यावर खड्डे दिसू लागले आहेत. पालिकेच्‍या या निकृष्ट कामावर संपात व्‍यक्‍त करण्यात येत आहे. पालिकेने येथील रस्‍ते कायमस्‍वरूपी सीसीचे बनवावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.