मुंबई जोरदार पाऊस

मुंबई जोरदार पाऊस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सलग तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. आज दिवसभर दमदार कोसळलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचले. आज पावसाने दुपारनंतर काहीशी विश्रांती घेत आपली रिमझिम सुरू ठेवली होती. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूकही मंदावली होती. येत्या दोन दिवसांत मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
गेल्या रविवारी आणि सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर मंगळवारीही कायम होता. सलग पावसामुळे अंधेरी सबवेत पाणी साचल्याने येथील वाहतुकीवर परिणाम झाला. सायन येथील गांधी मार्केट, चेंबूर शेल कॉलनी, अंधेरी, मालाड, मानखुर्द, वाशी नाका आदी सखल भागांत पाणी साचले. दुपारनंतर काहीशी उसंत घेत पावसाने आपली रिमझिम सुरू ठेवली होती. वातावरणातही गारवा निर्माण झाला होता. या पावसात मुंबईतील चौपाट्या, समुद्र किनाऱ्यांवर तरुणाईने गर्दी करीत आनंद लुटला. हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील पाणी साचणाऱ्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती.
.........
पावसाची नोंद
शहर - १७.४४ मि.मी
पूर्व उपनगर - २२.५५ मि.मी
पश्चिम उपनगर - १८.८७ मि.मी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com