मुंबईत पुन्हा २६/११ घडवण्याची धमकी

मुंबईत पुन्हा २६/११ घडवण्याची धमकी

Published on

मुंबई, ता. १८ : मुंबईवर पुन्हा ‘२६/११’सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून ही धमकी दिली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अज्ञाताने वाहतूक नियंत्रण कक्षाला फोन करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. या दोन्ही सरकारांना लक्ष्य करणार असल्याचे धमकीत म्हटले आहे. पोलिसांनी यासंदर्भात तातडीने तपास चालू केला आहे. मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्याची एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. १३ जुलै रोजी अज्ञाताने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सीमा हैदरला पाकिस्तानमध्ये परत न पाठवल्यास मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिस या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास करीत आहेत.

यापूर्वीही धमकी
बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटनेने ११ जुलै रोजी एक व्हिडीओ जारी करून भारताला धमकी दिली होती. सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवण्याबाबत एक सशस्त्र दहशतवादी बोलत होता. सीमा आणि तिच्या चार मुलांना पाकिस्तानच्या ताब्यात न दिल्यास त्याचे परिणाम पाकिस्तानातील हिंदू आणि इतर गैर-मुस्लिमांना भोगावे लागतील, अशी धमकी या दहशतवाद्यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.