मराठा आरक्षणासाठी धडक मोर्चा

मराठा आरक्षणासाठी धडक मोर्चा

Published on

मुंबादेवी, ता. १८ (बातमीदार) : मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसीमधून आरक्षण द्यावे, या मागणीकरिता येत्या ऑगस्ट क्रांतिदिनाचे औचित्य साधत राज्यभरातून मराठा युवक-युवती ऑगस्ट क्रांती मैदान ते विधानभवन असा धडक मोर्चा काढणार असल्याची माहिती आज महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मुंबईत दिली.
या वेळी त्यांच्यासोबत महिला अध्यक्ष वंदना मोरे, राज्य उपाध्यक्ष दीपक पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष विलास सावंत, डॉ. पी. एस. पाटील आणि श्रीकांत शेळके आदी उपस्थित होते. मराठा समाजाला कुणबीचा दाखला देण्यात यावा, मराठा वनवास यात्रा गेल्या सत्तर दिवसांपासून आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करीत आहे. त्या आंदोलनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन योग्य तो मार्ग काढावा, अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक लवकर उभे राहावे म्हणून जलद कार्यवाही व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या असून राज्यातील सरकारने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात; अन्यथा येत्या क्रांतिदिनी मराठा क्रांती सेना लाँग मार्च काढेल, असा इशारा महाराष्ट्र क्रांती सेना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.