वाडा भाजपकडून महिलांना भरडधान्याची माहिती

वाडा भाजपकडून महिलांना भरडधान्याची माहिती
Published on

वाडा, ता. १८ (बातमीदार) : भाजप जिल्हा महिला मोर्चाची बैठक वाडा येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात सोमवारी (ता. १७ ) पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी महिलांना भरडधान्य महोत्सवाची माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र यांच्या संकल्पनेतून लहान मुलांना दररोज ज्वारी, बाजरी, वरई, नागली, तूर, उडीद यांसारख्या भरडधान्याचा आहार देण्यात यावा. यामध्ये जास्त प्रमाणात प्रथिने असल्यामुळे हे शरीराला पूरक व पौष्टिक आहार आहेत. शरीरावर दुष्परिणाम करणारे बाहेरील खाद्यपदार्थ, फास्ट फूड मुलांना देण्याऐवजी प्रथिनयुक्त भरडधान्याचा रोजच्या आहारात समावेश असावा, अशा स्वरूपातील भरडधान्य महोत्सव या उपक्रमाची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस रश्मी जाधव, प्रदेश सचिव अपर्णा पाटील, प्रिया शर्मा, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती भोये आदींनी या बैठकीला मार्गदर्शन केले. तसेच बचत गटांमार्फत उत्तम लघुउद्योग चालविणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रदेश सदस्या चंदा दुबे, जिल्हा सरचिटणीस गीतांजली सावे, मेघना पाटील, ओबीसी महिला जिल्हाध्यक्षा धनश्री चौधरी, जिल्हा उपाध्यक्षा अर्चना भोईर, सचिव अश्विनी शेळके, सुनंदा कनोजा, वाडा तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले, जव्हार तालुका अध्यक्षा निर्मला घाटाळ, कविता गोतारणे, रजनी बोंड, निकिता पाटील, साक्षी पाटील आदी मान्यवरांसह कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.