एसटी कामगार संघटना अजित पवारांच्या भेटीला

एसटी कामगार संघटना अजित पवारांच्या भेटीला

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यकाळात जाहीर झालेल्या ४,८४९ कोटींच्या वेतन करारातील शिल्लक रकमेचे वाटप मूळ वेतनात करण्यात यावे किंवा सर्व रक्कम समायोजित करून दहा वर्षांकरिता सेवाज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोगाप्रमाणे देण्यात यावी, अशी आग्रही मागणी राज्य एसटी कामगार संघटनेने राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
अजित पवार यांनी तातडीने संघटना, प्रशासन आणि शासनाची बैठक बोलण्याचे आश्वासन संघटनेला दिले असल्याचे कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. प्रलंबित महागाई भत्ता तसेच सुमारे १२०० कोटी रुपये महागाई भत्त्याचा, घरभाडे भत्ता व वेतनवाढीच्या दराचा फरक अद्याप शिल्लक आहे. शिवाय सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यात यावी, अशा मागण्या या वेळी अजित पवार यांच्याकडे करण्यात आल्या. पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी भेट घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.