मुंबईत कचऱ्याच्या ४२१२ तक्रारींची नोंद

मुंबईत कचऱ्याच्या ४२१२ तक्रारींची नोंद

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर पडून राहिलेल्या कचरा, डेब्रिजच्या तक्रारी वाढल्या आहेत. पालिकेच्या व्हॅाट्‌सअॅप क्रमांकावर ४,२१२ तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यापैकी ३,१८६ तक्रारी नियमित कचऱ्याच्या; तर डेब्रिजच्या १,१२६ तक्रारींचा समावेश आहे. कचऱ्याच्या तक्रारीसाठी पालिकेने गेल्या ८ जून रोजी अॅप सुरू करत व्हॅाट्‌सअॅप नंबर जारी केला. या अॅपला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत नोंद झालेल्या ९५ टक्के तक्रारींची दखल घेतल्याचा दावा पालिकेने यावेळी केला.

पालिकेने २०३० सालापर्यंत मुंबई शहराला शून्य कचरा निर्माण करणारे शहर बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. पालिकेचे सफाई कामगार शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. मात्र लोकांकडून सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर कचरा, डेब्रिज टाकला जात असल्याचे चित्र आहे. यासाठी व्हॅाट्‌सअॅप क्रमांक जाहिर करण्यात आला असून यावर क्रमांकावर कचऱ्याच्या तक्रारी करण्याचे पालिकेने आवाहन केले आहे. त्यानुसार मागील महिनाभरात मोठ्या प्रमाणात तक्रारींची नोंद पालिकेकडे होत आहेत. मुंबईत सुमारे ६ हजार मेट्रिक टन घनकचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट देवनार, कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर केली जात आहे. असे असतानाही अनेक लोक कचरा आणि बांधकामातील डेब्रिज रस्ते, फूटपाथ आणि मोकळ्या जागेवर टाकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर पालिकेने ८१६९६८१६९७ हा हेल्पलाइन केला आहे. यावर नागरिकांकडून तक्रारी केल्या जात आहेत.

नियमित कचऱ्याच्या ३१८६ तक्रारींपैकी पालिकेने ३१८१ तक्रारींची दखल घेतली आहे; तर बांधकामातून जमा झालेले डेब्रिजच्या ११२६ तक्रारींपैकी ११२२ तक्रारींची पालिकेने दखल घेतली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.